कवठ फळाबद्दल माहिती

क वठ हे फळ आकाराने लहान असते आणि या फळाला कठीण कवच किंवा आवरण असते. संस्कृतमध्ये याला दधीफल किंवा कपित्थ असे म्हणतात तर , इंग्रजीमध्ये हे ‘ वूड एप्पल ’ असे म्हणतात. कवठाचे वैज्ञानिक नाव हिरोनिया लिमोनिया आहे. या फळावरील आवरण फिकट पांढ-या रंगाचे असते आणि एखाद्या कवचाप्रमाणे कडक असते. कवचाच्या आतील गर विटकरी रंगाचा असतो. हा गर चवीला आंबट गोड लागतो. कवठाचे अजूनही बरेच फायदे आहेत , त्याविषयी जाणून घेऊया! बीटा कॅरोटीन चा उत्तम स्त्रोत : काही लोकांची दृष्टी कमी वयातच क्षीण होते त्यामुळे त्यांना चष्मा किंवा लेंसेस यांसारख्या गोष्टींचा वापर करावा लागतो. लेन्स हा खूप खर्चिक पर्याय आहे आणि त्या सांभाळणे कठीण होऊन जाते तर , चष्म्याच्या वापरामुळे बऱ्याचदा नाकाजवळ काळे डाग तयार होतात. जर आपल्याला या दोन्ही संभावना टाळायच्या असतील तर डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर ती घेतली तर कमी वयातच दृष्टी क्षीण होण्याचा त्रास उद्भवणार नाही. यासाठी कवठाचे सेवन उपयोगी ठरू शकते. कवठामध्ये खूप प्रमाणात बीट कॅरोटीन असते. बिट कॅरोटीन शरीरात विटामिन ‘ ए ’ मध्ये हे रूपांतरित होतं. ज्यामुळे ...